DC vs RCB WPL 2024 Final Live Streaming: आज मिळणार नवा विजेता! दिल्ली आणि आरसीबीमध्ये टक्कर; येथे सामना पाहा थेट लाइव्ह
DC vs RCB (Photo Credit - X)

DC vs RCB WPL 2024 Final: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम शिगेला पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे. आरसीबी पहिल्यांदाच या लीगमधील विजेतेपदाचा सामना खेळताना दिसणार आहे, तर गेल्या मोसमात दिल्ली उपविजेते होते. याआधी एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने छोटे लक्ष्य राखून मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, कोणताही संघ जिंकला तरी ते त्याचे पहिले WPL विजेतेपद असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की या संघाचा पुरुष संघ देखील कधीही आयपीएल (IPL) विजेतेपद जिंकू शकले नाही. WPL फायनल मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रिमिंग केव्हा आणि कुठे पाहणार ते आम्ही तुम्हाला सांगू...

कधी आणि कुठे पाहणार सामना?

दिल्ली विरुद्ध आरसीबी यांच्यातील महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवार 17 मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. हा सामना स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी वर थेट प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमा ॲपवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील थेट सामना ऑनलाइन विनामूल्य पाहू शकाल. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या नंबरने लॉग इन करावे लागेल. मोबाइल वापरकर्ते किंवा लॅपटॉपवर, तुम्ही Jio सिनेमाच्या वेबसाइटला भेट देऊन थेट सामना पाहू शकता.

हे देखील वाचा: IPL 2024: संपूर्ण आयपीएल भारतात होणार, बीसीसीआय लवकरच वेळापत्रक करणार जाहीर, जय शाह यांची माहिती

अशी असु शकतो दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी.