उत्तर प्रदेश राज्यातील एका मुलीची ओढणी खेचून तिचा विनयभंग आणि त्यात तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना यूपी पोलिसांनी जबर मारहाण केली आहे. ज्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर प्लास्टर लावल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दावा केला जात आहे की, व्हिडिओत दिसणारे लोक हे उत्तर प्रदेशातील विनयभंग प्रकरणातीलच आरोपी आहेत. पण, ते वास्तव नाही. सोशल मीडियावर ज्या दाव्यासोबत हे व्हिडिओ शेअर केले जात आहेत त्यात तथ्य नाही.

प्राप्त माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिो हे राजस्थान राज्यातील आहेत. आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांनी राजस्थानमधील गुन्हेगारांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा किंवा तत्सम वागणूक देण्याचा इशारा दिला. त्यावेळचे हे व्हिडिओ असल्याचे पुढे येत आहे.

एक्स

ट्विट

वाचकांच्या माहितीसाठी असे की, उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील एका मुलीला काही नराधमांनी तिचा दुपट्टा ओढण्याचा प्रयत्न केल्याने तिचा जीव गमवावा लागला होता. रस्त्यावरुन सायकलवरुन जात असताना नराधमांनी तिची ओढणी खेचली. ज्यामुळे तिचा अपघात झाला आणि ती रस्त्यावर पडली. ज्यात पाठिमागून आलेल्या दुचाकीची धडक बसून तिचा मृत्यू झाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)