राजस्थान मध्ये अजमेर रोड वरील एका हॉटेलमध्ये डिनर साठी आलेल्या ग्राहकांमध्ये पनीरची भाजी सांडण्यावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा हात भाजीच्या प्लेटला लागल्याने ती खाली पडली पण त्याचे शिंतोडे दुसर्‍या टेबलवर बसलेल्या एका ग्राहकाच्या कपड्यांवर उडाल्यावरून वाद रंगला. यामध्ये एकमेकांच्या डोक्यात प्लेट, जोडे फेकून मारण्यापर्यंत हा वाद पोहचला. यामध्ये कर्मचारी देखील वातावरण काबूत ठेवू शकले नाही. नंतर पोलिसांना बोलवण्यात आले.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)