नोएडामध्ये साधारण रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणाऱ्या 19 वर्षीय प्रदीप मेहराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो रोज रात्री 10 किमी अंतर धावत आहे. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर मोठ्या भावासाठी जेवण बनवतो आणि सकाळी पुन्हा मॅकडोनाल्डमध्ये कामाला जातो. प्रदीप सैन्यात भरती होण्यासाठी रोज धावत आहे. प्रदीपच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रदीपचे सोशल मिडियावर बरेच कौतुक होत आहे. त्यानंतर आज प्रदीप नोएडाच्या डीएमला भेटला. डीएमनी प्रदीपला त्याच्या आईच्या उपचारासाठी आणि त्याला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच त्याला सैन्यात भरतीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)