Brazil Plane Skid Off Runway: ब्राझीलमधील एक विमान ओल्या धावपट्टीवर उतरल्यानंतर घसरले. ही धोकादायक घटना बुधवारी रोजी घडली, जेव्हा LATAM एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक LA 3300 सकाळी 9:20 वाजता साओ पाउलो-गुआरुलहोस विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर फ्लोरियानोपोलिस-हर्सिलिओ लुझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. विमान घसरल्याची घटना प्रवाशाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विमान धावपट्टीवरून घसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. विमानात बसलेले सर्व प्रवासी आरडाओरडा करू लागले. व्हायरल प्रेसच्या वृत्तानुसार, व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाच्या बाहेर पाऊस पडत होता आणि धावपट्टी पूर्णपणे ओली झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)