Noida: लिफ्टमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. सध्या, नागरिक  लिफ्टमध्ये अडकल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच एक प्रकार ग्रेटर नोएडातील बीटा-2 पोलीस स्टेशन परिसरात बनवलेल्या गोल्फ गार्डनिया सोसायटीमधून  समोर आला आहे. बुधवारी रात्री एकाच कुटुंबातील 8 जण लिफ्टमध्ये 2 तास अडकले होते. यामध्ये दोन वृद्ध, दोन महिला, दोन मुले आणि दोन तरुणांचा समावेश होता. लिफ्टमध्ये अडकलेले लोक बराच वेळ मदतीसाठी ओरडत राहिले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढले. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अडकल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन केंद्राचे अधिकारी इंदरपाल सिंह यांनी सांगितले की, बुधवारी रात्री 9.15 च्या सुमारास सोसायटीचे रहिवासी लिफ्टमध्ये चढले असता अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ते लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्ट चालवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. 10.30 वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. योग्य देखभाल न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)