Fact Check: नेटिझन्सला अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये हेल्मेटमध्ये लपलेले किंग कोब्रा दिसत आहे, बाईकवर निर्जीव पडलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ आणि सापाला वाचवण्याचा व्हिडीओ  वेगळा आहे. दोन व्हिडीओ सोबत जोडलेले दिसत आहे. कोब्रा चावल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, परंतु आम्ही याची पुष्टी करत नाही, कारण इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ एडिट केले गेले आहेत, इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. व्हिडीओमध्ये  हेल्मेट जमिनीवर ठेवलेले दिसते. तथापि, जेव्हा साप वाचवणारा काळजीपूर्वक काठीने आत दाबतो तेव्हा एक लहान परंतु अत्यंत विषारी किंग कोब्रा बाहेर येतो.

व्हायरल फेक न्यूज:

इन्स्टाग्रामवरही हेल्मेटमध्ये साप असल्याची खोटी बातमी व्हायरल 

 

View this post on Instagram

 

A post shared by sachin raghav (@sachinraghav__0)

खाली दिलेला व्हिडिओ वरील व्हायरल बनावट व्हिडिओशी जोडला जात आहे. हा व्हिडिओ 2023 सालचा आहे. बाईकवर बसलेली व्यक्ती आणि हेल्मेटमधील साप हे दोन वेगवेगळे व्हिडीओ  असल्याचे स्पष्टपणे दिसून येतं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)