Viral Video:  मुंबईजवळील मीरा भाईंदर शहरात पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरून एका युवकाने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाली 5 च्या सुमारास घडली आहे. या घटनेटा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाने उड्डाण पुलावरून मारल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी रेल्वे पोलिस आणि प्रवाशांनी धाव घेतली. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी तरुणाच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेनंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. शाहनवाज खान असं तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांच्या जबानी, त्याने तोल गेल्याची माहिती  दिली. त्यामुळे तो ट्रॅकवर पडला.

पहा अंगाला काटा आणणारा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)