Mumbai Rains: चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडांची पडझड; शॉर्ट सर्किट होऊन आगीचा भडका (Video)
चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड पडले. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. याचा भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mumbai Rains: राज्यभरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. चर्चगेट(Churchgate)-मरीन लाईन्स (Marine Lines) स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने, शॉर्ट सर्किट झाला. ज्यामुळे जोरदार स्फोट झाले आणि आग भडकली. या घटनेचा व्हिडीओ लोकलमधील काहीप्रवाशांनी रेकॉर्ड केला. स्फोटाचे मोठे आवाज झाले. काल राज्यात मान्सून दाखल (Mumbai Weather Forecast) झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2025 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

