Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू

मुंबई लोकल मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले आहे. हे प्रवासी फूटबोर्ड वर उभं राहून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू
Photo Credit- X

मुंबई मध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे 5 प्रवासी मुंब्रा स्थानकामध्ये ट्रॅक वरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  विरूद्ध दिशेने जाणार्‍या दोन लोकल ट्रेन मधील प्रवासी एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. दरम्यान ट्रॅक वर पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे.   काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुंबई लोकल अपघात

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 6585 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).