पाकिस्तानमध्ये X (पूर्वीचे ट्विटर) कायमचे बंद केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा असून हा निर्णय नेमका केव्हा घेतला जाणार याबाबत मात्र स्पष्टता नाही. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एक्सला काही सामग्री त्यांच्या मंचावरुन हटविण्याची विनंती केली. मात्र, एक्सकडून त्याला थेट नकार दर्शवण्यात आला. त्यामुळे नाराज झालेले पाकिस्तान सरकार आणि अधिकारी संपूर्ण पाकिस्तानातच X (पूर्वीचे ट्विटर) बंद करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. अर्थात आतापर्यंत तरी पाकीस्तान सरकार अथवा अधिकृत अधिकारी, संस्थांनी याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)