ST बसला मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाकडून एसटीला दुसऱ्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती महाविकास आघाडी सरकार मधील परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून हजारो कर्मचार्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
MAHARASHTRA DGIPR ट्वीट
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष @advanilparab यांच्या पाठपुराव्यामुळे मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाकडून एसटीला दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे ९३ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार आहे pic.twitter.com/AUSkBTsSA2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)