लेखक, पत्रकार  शिरीष कणेकर यांचे आज (25 जुलै) निधन झाले आहे. इंडियन एक्सप्रेस मधून त्यांच्या पत्रकारितेला सुरूवात केली क्रिडा, राजकारण आणि सिनेमा याबाबत त्यांनी विशेष लेखन केले आहे. त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम करताना स्टॅन्डअप कॉमेडी शो देखील देशा-परदेशात केले होते. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने माहिमच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथेच ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)