पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान माहीम खाडीवरील पूलाच्या Re-girdering कामांसाठी 11-12 आणि 12-13 एप्रिलच्या मध्यरात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे ऑपरेशन्सची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी पुल क्रमांक 20च्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11-12 एप्रिल रोजी रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि सकाळी 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल. 12-13 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9 पर्यंत अप, डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल, तर अप फास्ट मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 पर्यंत ब्लॉक असेल. या काळात 300 पेक्षा अधिक रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)