शाळा कॉलेजला सुट्ट्या असल्याने मुंबईत पर्यटकांची रेलचेल बघायला मिळत आहे. मुंबईतील राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला काल एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ११ लाख ५ हजार ९२५ रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं. एकाच दिवसातील पर्यटकांचा आणि उत्पन्नाचा हा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.
मुंबईतली #राणीची_बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला काल एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ११ लाख ५ हजार ९२५ रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं. एकाच दिवसातील पर्यटकांचा आणि उत्पन्नाचा हा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)