मुंबई मध्ये एका कचरा वेचणार्‍या व्यक्तीने 70 वर्षीय महिलेला लुटून तिच्याकडील 3000 रूपघेण्यासाठी तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या कांदिवली भागातील आहे. दरम्यान आरोपी मन्सूर शेख ला अटक करण्यात आली आहे. मन्सूर शेख हा 51 वर्षीय व्यक्ती आहे. तर पीडीत महिला अनुसया सावंत ही चारकोप मध्ये हिंदूस्तान नाका जवळ फूटपाथवरच राहत होती. . बुधवार (7 फेब्रुवारी) च्या सकाळी त्याने तिला दगडाने ठेचून मारलं आणि 3000 रूपपे पैसे घेऊन पसार झाला. दरम्यान पोलिसांना जेव्हा या खूनाचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी शोधाशोध केली. आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)