Pune News : मावळ (Maval) मधील उर्से टोल (Urse Toll) नाक्यावर 50 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान, पोलिसांना ही रक्कम आढळून आली. एका महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख (seized 50 lakh cash) रक्कम मिळून आली असून त्याबाबत योग्य खुलासा करण्यात आलेला नाही. (हेही वाचा :Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)