Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले
Cybersecurity | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Cyber Crime : सध्याच्या ऑनलाईन जगात फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मोठ्या उद्योगपतींपासून ते सर्वसामान्यांना अशा फसवणूकींमुळे आपले कष्टाचे पैसे गमवावे लागतात. पुण्यात (Pune) बाणेर (Baner) मधील एका डॉक्टरलाही अशाच घटनेला सामोर जावं लागलं आहे. तैवानमध्ये एक कुरिअर पाठवले होते. ते सायबर चोरट्यांच्या हाती लागले. त्यांनी पैसे कमावण्याच्या लालसेत कुरिअरमध्ये अमलीपदार्थ आढळल्याचे डॉक्टला फोनवर सांगितले. (Cyber Crime) यात सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम डॉक्टरांकडून लाटली गेली. या प्रकरणी सायबर पोलिसात (Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा : Pune Cyber Crime: पार्ट टाईम जॉबच्या नादात पोलिस हवालदाराने गमावले 5 लाख, पुण्यातील घटना )

पुण्यातील शिवाजीनगर भागातील क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सायबर चोरट्यांनी १ मार्चला डॉक्टरच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तुम्ही तैवानला पाठवलेले कुरिअर कंपनीने परत पाठविले आहे. मुंबई विमानतळावर पार्सल जप्त केले आहे. त्यात अमली पदार्थ मेफेड्रोन आढळले आहे. त्याशिवाय, पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, परदेशी चलन आणि लॅपटॉप त्यात आढळले आहे. विशेष म्हणजे मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे चोरट्यांनी यावेळी म्हटले. त्याशिवाय, चौकशीसाठी कार्यालयात हजर रहावे लागेल. मात्र, तोपर्यंत तुमची बँक खाती गोठवण्यात येतील. पडताळणी होईपर्यंत तुमच्या बॅंकेतील रक्कम सरकारी बँकेत जमा करण्यात येतील, असे चोरट्यांनी सांगितले. (हेही वाचा : Pune Cyber Crime: ऑनलाईन पेमेंट कंपनीची दोघांनी केली फसवणूक, 3.5 कोटी रुपयांचा लावला गंडा, आरोपींना अटक )

त्यावर, डॉक्टर घाबरून तात्काळ दिलेल्या बँक खात्यात एक कोटी १ लाख ३० हजार रुपये हस्तांतरित केले. कालांतराणे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टरने २३ मार्चला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.