Pune Cyber Crime: देशात ठिकठिकाणी सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान पुण्यात ऑनलाईन पेमेंट कंपनीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनी कंपनीची तब्बल 3.5 कोटींची फसवणूक केली. या दोन सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.पुणे शहरातील येरवाड येथील इझी पे. प्रा.लि कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही कंपनी नागरिकांना ऑनलाईन पेमेंटची सुविधा देते. पुणे सायबर पोलिसांनी ही फसवणूक उघडकीस आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इझी- पे चे एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे काम सुरु होते. दोघांनी कंपनीच्या वेबपोर्टल अॅपद्वारे कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी 52 लाख 70 हजार रुपयांची रक्कम इतर 44 बँक खात्यांत जमा करून फसवणूक केली. या बाबत कंपनीच्या मालकांनी पुणे साबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा- धक्कादायक; पाकिस्थान हॅकर्सनी नव्या सायबर हल्ल्यात भारतीय लष्कर)
या घटनेअंतर्गत चौकशीसाठी पोलिसांनी पथक नेमलं, दरम्यान पुणे पोलिसांनी पथक दिल्लीला रवाना केली. त्यानंतर पोलिसांना समजले की, आरोपी हा दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी दोन आरोपींना येथून अटक केली. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि आयुब बशिर आलम असं आरोपींचे नाव आहे.