Pune Cyber Crime: पार्ट टाईम जॉबच्या नादात पोलिस हवालदाराने गमावले 5 लाख, पुण्यातील घटना
Cyber Attack Representational Image | (Photo Credits: PTI)

Pune Cyber Crime: पुणे हे विद्येचे माहेर घर असं म्हटलं जात, परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे हे चित्रच संपुर्ण बदलत जात आहे.दरम्यान पुणे शहरात एका पोलिस हवालदार सायबर क्राइमचा बळी पडला आहे.त्याचे या घटनेत 5 लाख रुपये गमावले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. पुण्यातील शिवाजी नगर पोलिस कॉलनीत राहाणारे या पोलिसाची सायबर क्राईम कडून 5 लाख रुपयेची फसवणूक झाली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सुरुवातीला पीडीत पोलिस हवालदाराला त्याच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांकडून मेसेज आला. सोशल मीडियावरील जाहिराती आणि पसंती मिळवणाऱ्या कॅन्टेट संबंधित ऑनलाइन टास्कद्वारे आकर्षक परतावा (पैसे) देण्याचे आश्वासन देऊन त्याला भुरळ घातली. त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कॅन्टेंटचा वापर केला आणि फसवणूकीसाठी सारखा संवाद साधला. पार्ट टाईम काम करून कमवा असा एका टास्क सुरुवातीला दिला. (हेही वाचा- पार्ट टाईम जॉबच्या आहारी गेलेल्या तरुणाला 61 लाखांचा गंडा, बंगळुरुमधील घटना)

सायबर गुन्हेगारांनी पीडित पोलिसाला जाळ्यात अडकवले. सुरुवाकीला काम दिले आणि पूर्ण केलेल्या कामांसाठी पैसे दिले जायचे. त्यानंतर त्यांना कामासाठी ₹4,99,000 मागितले, सुरुवातीला नकार दिला परंतु असा दावा केला की त्याला ऑनलाइन काम करण्यासाठी दिले की दुप्पट परतावा मिळेल. पीडित पोलिसांनी संपुर्ण रक्कम एका वेबसाईट द्वारा भरून दिली. पैसे जमा केल्यानंतर त्यांनी त्याचे मोबाईक नंबर ब्लॉक केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने या घटनेची माहिती पोलिसांत दिली.