सातारा मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं आज ( 19 मे) निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतापराव भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केलं होते. चार वेळा आमदार देखील होते. प्रतापराव भोसले यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
अजित पवारांकडून शोक व्यक्त
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण… pic.twitter.com/T7OKBa8emN
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)