भारतामध्ये PFI वर बेकायदेशीर संघटना असल्याचं सांगत आज केंद्र सरकारने कारवाई केली आहे. यासोबत त्यांच्याबरोबर काम करणार्या अन्य 6 संघटनांना देखील कारवाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान केंद्राच्या या कारवाईला महाराष्ट्राचाही पाठिंबा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातही त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
देशविघातक कृत्य करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाहीत- मुख्यमंत्री @mieknathshinde @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi #PFI pic.twitter.com/pe3a75kk2R
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 28, 2022
सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या आणि तेढ निर्माण करणाऱ्या पीएफआय आणि संबंधित ६ संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची माहिती.@Devendra_Office @DDNewslive @DDNewsHindi #PFI pic.twitter.com/Jhy3dYR1sD
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)