Vijay Karanjkar joined Shiv Sena: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील (UBT) विजय करंजकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या घटनेनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेर ठाकरे गटाला धक्काच बसला आहे. विजय करंजकर हे नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातील नेते होते. रविवारी मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत विजय यांनी हातात झेंडा घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरेंनी नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. (हेही वाचा- शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)