कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवरुन विरोधक आक्रमक आहेत. विरोधकांनी कांद्याचा मुद्दा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लावून धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. गुजरात सरकारही त्यांना मदत करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा केला जात असेल, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत का दिली जात नाही? असा सवालही छगन भुजबळ यांनी मुंबईत उपस्थित केला आहे.

छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले की, याशिवाय नाफेडने थेट बाजारात जाऊन कांद्याचा लिलाव करावा. यामुळे किमान प्रति क्विंटल 100-200 रुपयांनी भाव वाढेल... सरकारने योग्य ती मदत न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरू शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)