मुंबईचा पाणीपुरवठा सात तलाव आणि धरणांवर अवलंबून आहे, ज्यामध्ये शहराबाहेरील वैतरणा, तानसा, भातसा आणि मोडक सागर आणि मुंबईतील तुळशी, विहार आणि पवई तलाव यांचा समावेश आहे. ही धरणे मुंबईला पिण्याचे पाणी पुरवतात, ज्यामध्ये भातसा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारा आहे. मात्र आता मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन वर्षातील हा जास्त पाणीसाठा असला तरी, पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे बीएमसीसमोर मोठे आव्हान आहे. अशाप्रकारे मुंबईत विशेषतः एप्रिल महिन्यात, पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. वाढते शहरीकरण, अपुरा पाऊस आणि कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीकरण वाढले आहे, ज्यामुळे टंचाई तीव्र झाली आहे. बीएमसीने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे, कारण पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरवणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या नव्या नियमांविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप जाहीर केला, ज्यामुळे 1,500 टँकरचा पुरवठा थांबला. याचा परिणाम हॉस्पिटल, बांधकामे, आयपीएल सामने आणि झोपडपट्ट्यांवर झाला आहे, जिथे टँकर हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. बीएमसीने राज्य सरकारकडे वैतरणा आणि भातसा धरणांतून राखीव पाण्याची मागणी केली आहे, पण अद्याप निर्णय प्रलंबित आहे. ठाणे आणि नवी मुंबईलाही पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे, जिथे काही भागांत 10% कपात लागू आहे. (हेही वाचा: Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला)
Mumbai Water Crisis:
Mumbai Water Shortages | मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; धरणांमध्ये 31टक्के पाणीसाठी शिल्लक #mumbaiwater #watersupply #watershortages #waterscarcity #zee24taas pic.twitter.com/jvO0a8GnQc
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)