मुंबईची नागरी वाहतूक संस्था बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने (BEST) बुधवारी सांगितले की, M/S Mateshwari Ltd द्वारे चालवल्या जाणार्‍या टाटा सीएनजीच्या (TATA CNG) 400 भाडेतत्त्वावरील बसेस या आता रस्त्यावर धावणार नाहीत. एका महिन्यात तब्बल तीन वेळा या बसेसला आग लागण्याच्या घटना समोर आल्यानंतर बेस्टने या 400 बसेस प्रवाशांच्या सेवेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आगीच्या घटना लक्षात घेता, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी OEM (मूळ उत्पादक) आणि ऑपरेटर हे बसेसमध्ये आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करेपर्यंत या बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे बेस्टने सांगितले आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली. बेस्टने सांगितले की, या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी बेस्टसाठी सार्वजनिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत ते तडजोड करू शकत नाही. यामुळे बेस्ट बसेसच्या वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)