Man Gets Stuck In Grinder: मुंबईच्या वरळी आदर्श नगरमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ग्राइंडर मशीनमध्ये अडकल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मृत सूरज नारायण यादव हा झारखंडचा रहिवासी होता, तो मुंबईतील रस्त्यावरील चायनीज फूड स्टॉलवर काम करत होता. रविवारी काम करत असताना तो ग्राइंडर मशिनमध्ये अडकला, त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. सूरज मशीन चालवत असताना त्याचा शर्ट मशीनमध्ये अडकून ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सूरजला मशीनमधून बाहेर काढले. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्य आरोपी सचिन कोठेकर याच्याविरुद्ध निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. स्टॉल मालक सचिन कोठेकरने सांगितले की, सूरज हा चार महिन्यांपासून या स्टॉलवर काम करत होता. त्याला अन्न तयार करण्यात मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सूरजला ग्राइंडर मशीन चालवण्याचा कोणताही अनुभव किंवा प्रशिक्षण नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Dumper Catches Fire in Byculla: भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात)
ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू-
VIDEO: Grinder machine crushes man to death in Mumbai’s Worli; investigation underway pic.twitter.com/7IXVYlQxul
— Shivaji Mishra | शिवाजी मिश्रा (@08febShivaji) December 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)