मुंबईतील कुर्ला येथून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या ठिकाणी एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. परवेझ सिद्दीकी असे या आरोपी पित्याचे नाव असून, तो त्याने आपल्या पत्नीशी झालेल्या वादात रागाच्या भरात तिच्यावर हल्ला केला आणि नंतर हा राग मुलीवर काढला. आफिया सिद्दीकी असे पिडीत मुलीचे नाव आहे. संतापलेल्या परवेझने आपल्या मुलीला जोरात जमिनीवर फेकले, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. आफियाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली आणि त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलम 103(1) आणि 115(2) अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: मुलाचा मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न; चिडलेल्या आईने केली हत्या, मृतदेहाचे 5 तुकडे करून कालव्यात फेकून दिले)
पित्याने 4 वर्षांच्या मुलीची केली हत्या-
Mumbai Horror: Man Kills 4-Year-Old Daughter After Heated Argument With Wife, Arrested
Read more👇https://t.co/olwFriZM1x#MumbaiNews #MumbaiCrime #MaharashtraNews
— Lokmat Times (@lokmattimeseng) February 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)