
आंध्र प्रदेशातील प्रकाशम (Prakasam) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. मुलाने त्याच्या मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चिडलेल्या आईने मुलाच्या वाईट चारित्र्याला कंटाळून त्याची हत्या केली. महिलेने मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले आणि ते कालव्यात फेकून दिले. मृताचे नाव के श्याम प्रसाद (35) असे आहे, तर आरोपी आईचे नाव के लक्ष्मी देवी (57) आहे. पोलीस अधीक्षक ए.आर. दामोदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. लक्ष्मी देवीच्या नातेवाईकांनीही तिला या गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप आहे.
दामोदर म्हणाले की, लक्ष्मी देवी आपल्या मुलाचे ‘क्रूर आणि असभ्य वर्तन’ सहन करू शकली नाही आणि त्यामुळे तिने कुऱ्हाडीने किंवा धारदार शस्त्राने त्याचा खून केला. त्यांनी पुढे सांगितले की, मृत व्यक्ती अविवाहित होता, त्याने बेंगळुरू, खम्मम आणि हैदराबादमधील त्याच्या इतर महिला नातेवाईकांशीही गैरवर्तन केले होते. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रसादने हैदराबाद आणि नरसारावपेटमध्ये त्याच्या मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. प्रसादच्या अशा वागण्याला कंटाळून त्याच्या आईने त्याची हत्या केली. (हेही वाचा: Hyderabad Shocker: हैदराबादमध्ये बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)
आईने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याचा खून केला आणि मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आला. ते तीन पोत्यांमध्ये भरून जिल्ह्यातील कुंबुम गावातील नाकालागंडी कालव्यात फेकून दिले. या प्रकरणातील आरोप सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे आणि लोक याला एक जघन्य गुन्हा मानत आहेत. फरार आरोपींवर बीएनएसच्या कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.