मुंबई मध्ये पावसाळ्याच्या  दिवसांंत समुद्राला उधाण आल्यान अनेक  अप्रिय घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आता  9  जुलै दिवशी  मुंबई च्या वांद्रे भागात  27 वर्षीय तरूणी बुडाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यानंतर तातडीने अग्निशमन दल दाखल झाले असून तरूणीचा शोध घेणं सुरू आहे. सध्या बीएमसी कडून भरतीच्या वेळेस नागरिकांना समुद्र किनारी जाण्यापासून रोखलं  जात असल्याचंही सांगितलं आहे. या बुडालेल्या तरूणीचं नाव ज्योती सोनार आहे.नक्की वाचा:Juhu Beach Tragedy: समुद्रात बुडालेल्या 4 पैकी दोघांचा सापडला मृतदेह.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)