मुंबई मध्ये सध्या बिपरजॉय चक्रिवादळाच्या प्रभावामुळे वातावरण बदललं आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र. मुंबईकरांना हे वातावरण कितीही हवंहवंस वाटत असलं तरीही सध्या त्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचा देखील विचार करणं आहे आवश्यक आहे. मुंबईच्या जुहू बीचवर (Juhu Beach) काल असाच अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेणं 4 जणांच्या जीवावर बेतलं आहे. समुद्रात बुडालेल्या 4 किशोरवयीन मुलांपैकी 2 जणांचे मृतदेह हाती आले आहेत तर 2 जणांचा अद्याप शोध सुरू आहे. BMC Disaster Control कडून आज ही माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह सापडलेल्या मुलांची नावं Dharmesh Valji Faujiya आणि Shubham Yogesh Bhogania आहे. हे दोघं 16 वर्षीय होते. त्यांचे मृतदेह
R.N. Cooper Hospital मध्ये पाठवण्यात आले आहेत. Manish Yogesh Bhogania (12) आणि Jay Roshan Tajbariya (15) हे बेपत्ता आहेत. सोमवारी एकूण 5 जण बुडाले होते. स्थानिकांनी एकाला वाचवले त्यानंतर घडला प्रकार पोलिस, अग्निशमन दलाला कळवला. सोमवारी रात्री उधाणलेल्या समुद्रामध्ये मुलांचा शोध घेण्यासाठी नेव्ही चॉपर, स्पीड बोट काम करत होत्या.
शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला ही मुलं भेटली होती. मुंबईचं वातावरण पाहता त्यांनी समुद्रावर फिरायला जायचं ठरवलं. आठपैकी, पाच जणांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि ते एका लहान मासेमारी जेट्टीवर गेले, तेथून ते पाण्यातील मोठ्या लाटांसोबत वाहून गेले आणि विजेच्या प्रवाहाने त्यांना समुद्रात ओढले. Cyclone Biparjoy दरम्यान मुंबईच्या जुहू बीचवर सहा जण समुद्रात बुडाले; दोघांची सुटका, चार बेपत्ता, बचावकार्य सुरू .
आठ अल्पवयीन या मुलांना पोहता येत नव्हते. वाकोला येथील झोपडपट्टी भागात ते राहत होते. मुंबईतील पावसाळ्याची ही पहिली मोठी शोकांतिका आहे.