मुंबई मध्ये रात्रभर पडलेल्या पावसाच्या संततधारेनंतर आज सकाळी देखील पावसाचा जोर कायम राहिल्याने सखल भागामध्ये पाणी भरायला सुरूवात झाली आहे. यामुळे वाहतूक देखील मंदावली आहे. सायन, दादर भागामध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. उपनगरीय रेल्वे सेवा देखील उशिराने धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंधेरी सब वे देखील सकाळी पाणी साचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंंदाजानुसार आज मुंबई मध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत.
गांधी मार्केट मध्ये पाणी
#WATCH | Maharashtra: Heavy downpours in Mumbai cause waterlogging in parts of the city, visuals from Gandhi Market this morning. pic.twitter.com/vFdN2cATBz
— ANI (@ANI) July 18, 2024
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर वाहतूक
#WATCH | Maharashtra: Mumbai city receives rainfall this morning, visuals from Eastern Express Highway pic.twitter.com/Z1rpS5dqj3
— ANI (@ANI) July 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)