राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने  अटक केली आहे. दरम्यान या महिलेविरुद्ध धनंजय मुंडे यांनी पोलिसांत खंडणीची तक्रार दाखल केली होती. या महिलेने धनंजय मुंडे यांना या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरद्वारे कॉल केला आणि दुकान आणि महागड्या मोबाइल फोनची मागणी केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या मागण्या मान्य न केल्यास मंत्र्याची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी आरोपी महिलेने दिली होती.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)