आज संध्याकाळी उशिरा मुंब्रा स्थानकात फलाट क्र.1 वर सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल, प्लॅटफॉर्मच्या काठाला घासली गेली. यामुळे ट्रेन काही काळ तपासणीसाठी थांबवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी ट्रेन तपासल्यानंतर आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. ही गाडी 9.20 ते 9.45 पर्यंत मुंब्रा स्थानकात थांबल्याने इतर अनेक गाड्यांवर त्याचा परिणाम झाला होता. या कालावधी मध्ये थांबवण्यात आलेल्या K117 कल्याण स्लो लोकल, A57 अंबरनाथ स्लो लोकल, DK21 कल्याण स्लो लोकल, DL49 डोंबिवली स्लो लोकल अशा सर्व गाड्या सोडण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: मुंबई लोकलच्या लेडीज डब्ब्यात गर्दीच्या वेळी तरूणाने चक्क ओढला गांजा; व्हिडिओ वायरल)

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)