मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिलेच्या डब्यात एका तरुणाने गांजा काढताना पाहिले तेव्हा महिला प्रवाशांना धक्काच बसला. मंगळवारी संध्याकाळी लोकल प्रवासाच्या गर्दीच्या वेळी एका तरुणाने महिलांच्या डब्यात प्रवेश केला. तो नंतर स्मोकिंग करताना दिसला, ज्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले. डब्बातून त्याला काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले पण त्यामध्ये या महिला अपयशी ठरल्या. हा मुलगा संध्याकाळी 7.14 च्या सीएसएमटी बदलापूर ट्रेन मध्ये भायखळा स्थानकात चढला होता. नंतर महिला आरपीएफ कडून कुर्ला स्थानकात त्याला उतरवण्यात आलं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)