मुंबईची नस म्हणून ओळखल्या जाणारी मुंबई लोकल सेवा काही मार्गावर अचानक ठप्प झाल्याची माहिती आहे. प्रामुख्याने पनवेल सीएसएमटी मार्गावरील लोकल अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे समजते. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत रोष व्यक्त केला असून, रेल्वे प्रशासनालाही माहिती दिली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, कार्यालयीन वेळेवर अनेक लोकल ट्रेन रद्द. पनवेल, मुंबई येथे हजारो लोक ट्रेनची वाट पाहत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ट्विट

दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे वातानुकुलीत लोकल रुळावरच रखडली आहे. परिणामी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे, असे समजते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)