Sudan Attack:  सुदानची राजधानी खार्तूमच्या उत्तरेकडील पॅरालिमेटरी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) ने केलेल्या हल्ल्यात मृतांची संख्या 54 वर पोहोचली आहे. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. शिन्हुआ न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सबरीन बाजारातील या हल्ल्यात 158 लोक जखमी झाले आहेत. मंत्रालयाने नागरिकांवरील या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की हे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन आहे.  (हेही वाचा  - OnlyFans Model Death: इमारतीवरून पडून पोर्नस्टार Anna Beatriz Pereira Alvesचा मृत्यू! 'Threesome' दरम्यान अपघात झाला)

सुदानचे माहिती मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते खालिद अली अलिसिर यांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली. त्यांनी सांगितले की हा हल्ला नागरिकांसाठी विनाशकारी होता आणि त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. ओमडुरमनच्या अल-नाओ रुग्णालयातील एका डॉक्टरने शिन्हुआला सांगितले की, प्रकृती अत्यंत गंभीर आहे. रुग्णालयाला रक्तदात्यांची आणि औषधांची नितांत गरज आहे.

ओमडुरमनमधील शिन्हुआच्या पत्रकाराच्या मते, बाजाराजवळील निवासी भागांनाही गोळीबाराचा फटका बसला. तथापि, या हल्ल्याबाबत आरएसएफकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. सुदानी सैन्याने (एसएएफ) म्हटले आहे की आरएसएफ खार्तूम प्रांतातील बहरी शहरातून करारी भागात सतत हल्ले करत आहे. ओमडुरमनमधील हा एकमेव असा भाग आहे जो अजूनही पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि दाट लोकवस्तीचा आहे.

खार्तूममध्ये अलिकडेच एसएएफ आणि आरएसएफमधील लष्करी संघर्ष तीव्र झाला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एप्रिल 2023 पासून, सुदानमध्ये सैन्य (SAF) आणि RSF यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत 29,683 लोक मारले गेले आहेत, तर 1.5 कोटींहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.