Car Bomb Blast In Syria: उत्तर सीरियातील (Northern Syria) मनबिज शहरात (Manbij City) शेती कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ मोठा बॉम्बस्फोट (Bomb Explosion) झाला. प्राप्त माहितीनुसार, हा स्फोट एका कारमध्ये झाला, ज्यामध्ये किमान 15 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. स्थानिक नागरी संरक्षण आणि युद्ध देखरेख संस्थांनी याबद्दल माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर ईशान्य अलेप्पो प्रांतातील मनबिज हे हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. हा तीन दिवसांत झालेला दुसरा मोठा स्फोट आहे.
मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश -
तुर्की सीमेपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या मनबिजमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. नागरी संरक्षण बचाव सेवेने मृतांमध्ये 14 महिला आणि एका पुरूषाचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. या स्फोटोत 15 महिला जखमी झाल्या. बळी पडलेले लोक शेती कामगार होते. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं एका नागरी संरक्षण अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले. (हेही वाचा -Sudan Attack: सुदानमधील ओमदुरमन मार्केटवर निमलष्करी दलाच्या हल्ल्यात 54 जण ठार, 158 जखमी; मंत्रालय)
Car bomb blast near Syria's Manbij kills 15, civil defense says https://t.co/TsB9TvifEX pic.twitter.com/3UKHhmqjhn
— Reuters (@Reuters) February 3, 2025
यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटोत चार जणांचा मृत्यू -
दरम्यान, शनिवारी, मनबिजमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच मुलांसह नऊ जण जखमी झाले, असे सीरियाची राज्य वृत्तसंस्था साना ने वृत्त दिले आहे. (हेही वाचा -Philadelphia Plane Crash: फिलाडेल्फियामधील रूझवेल्ट मॉलजवळ एअर अॅम्ब्युलन्स कोसळली; एका रुग्णासह किमान 6 जणांचा मृत्यू (Watch Video))
दक्षिणेकडील दारा प्रांतात बॉम्बस्फोट
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सीरियाच्या दक्षिणेकडील दारा प्रांतातील महाजा शहरात बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट रस्त्याच्या कडेला झाला. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. दारापूर्वी, उत्तर सीरियातील अझाझ प्रांतातील शहरात एक बॉम्बस्फोट झाला. बाजारात झालेल्या या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले होते.
सीरियामधील परिस्थिती -
सीरियात दहशतवादामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा प्रभाव पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे, परंतु तरीही दहशतवादी कारवाया संपलेल्या नाहीत. सीरियामध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत.