Philadelphia Air Ambulance Crash (Photo Credit - X/@TheInsiderPaper)

Philadelphia Plane Crash: ईशान्य फिलाडेल्फियामधील (Northeast Philadelphia) रूझवेल्ट मॉलजवळ (Roosevelt Mall) एअर अॅम्ब्युलन्स असलेले लिअरजेट 55 विमान कोसळले. (Air Ambulance Crash) या दुर्घटनेत एका रुग्णासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला. विमान जमिनीवर आदळले आणि स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात मोठी आग लागली. यामुळे अपघातस्थळी असलेले अनेकजण जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी विमानात चार क्रू मेंबर्स आणि दोन प्रवासी होते.

अपघातामुळे मोठा स्फोट -

फ्लाइट रडार 24 नुसार, लिअरजेट 55 हे विमान ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. विमान 23:06 ​​UTC वाजता निघाले आणि 23:06:54 वाजता कमाल 1650 फूट उंचीवर पोहोचले.

या अपघातामुळे मोठा स्फोट झाला आणि अनेक घरांना आग लागली. तसेच जमिनीवरील अनेक लोक जखमी झाले. (हेही वाचा -Plane Crash Video: वॉशिंग्टन डीसीमध्ये विमान नदीत कोसळले, बचावकार्य सुरू, पाहा व्हिडीओ)

अपघाताचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल -

सोशल मीडियावर शेअर केलेल्या दृश्यांमध्ये हा अपघात कारच्या डॅशकॅम कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून येत आहे. तसेच घराच्या डोअरबेल कॅमेऱ्यातही हा अपघात कैद झाला आहे. तथापी, पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'ईशान्य फिली येथे झालेल्या छोट्या खाजगी विमान अपघाताला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आपत्कालीन सेवा पूरवत आहोत. अधिक माहिती उपलब्ध होताच आम्ही अपडेट्स देत राहू.'

अपघातस्थळाजवळील रस्ते बंद -

फिलाडेल्फियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने सांगितले की, मोठी दुर्घटना घडली असून परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तथापी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.