 
                                                                 मुंबई मध्ये शनिवारी रात्री हरिद्वारहून (Haridwar) मुंबईला आलेल्या एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी वांद्रे येथील रेल्वे पोलिसांनी एका कुलीला अटक केली आहे. वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) मध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये महिला एकटीच झोपली असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली. ही घटना रविवार, 1 फेब्रुवारीच्या रात्रीची आहे.
महिलेच्या नातेवाईकाने नंतर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला त्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी का नव्हते, याची चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही महिला एका नातेवाईकासोबत दुसऱ्या राज्यातून मुंबईमध्ये आली होती. नातेवाईक काही कामासाठी गेले आणि ट्रेनमधील इतर प्रवासी निघून गेल्यानंतर ती महिला प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ झोपली आणि नंतर रेल्वेच्या रिकाम्या डब्यात शिरली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या एका कुलीने महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्ती केली. Vasai Crime: कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्याकडून बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरू .
काही कामासाठी गेलेले महिलेचे नातेवाईक परत येईपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर नातेवाईकाने रेल्वे सुरक्षा दल आणि सरकारी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोर्टरचा माग काढण्यात यश मिळविले आणि न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women / Senior Citizen Helpline – 1091/ 1291; Missing Child and Women – 1094
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
