Indian Wedding (Photo credits: Pixabay)

Delhi Wedding, Groom’s Dance: लग्न सोहळा, वरात आणि तत्सम कार्यक्रमांमध्ये बॉलीवूड चित्रपटांतील गाण्यांवर डान्स करणे हे तसे नवीन नाही. अगदी नवरा-नवरी, वरबाप-वरमाई आणि वऱ्हाडीही डॉल्बी किंवा डिजेच्या तालावर जोरदार ठेका धरतात. हे सगळे राजीखुशी आणि आनंदाच्या जल्लोषात सुरु असते. पण, दिल्ली येथे काहीसा वेगळाच प्रकार घडला. आपल्या कन्येच्या लग्नात नवरदेवाने म्हणजेच होऊ घातलेल्या जावयाने 'चोली के पीछे क्या है' (Choli ke Peeche Kya Hai) गाण्यावर डान्स केला. हा डान्स मुलीच्या वडिलांना म्हणजेच वरबापाला मुळीच आवडला नाही. हा डान्स पाहून त्यांना इतका संताप आला की, त्यांनी चक्क विवाह मोडला आणि आपल्या मुलीस सोबत घेऊन वऱ्हाडी मंडळीसह आल्या पावली ते परत निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Social Media Trends) झाला आहे. जो पाहून वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'चोली के पीछे क्या है' गाण्यावर डान्स

नवी दिल्लीतील लग्नस्थळी वर त्याच्या वरात (लग्नाची मिरवणूक) घेऊन पोहोचला. याच वेळी लग्नात जाणारा बँड आणि डिजेवर वाजवल्या जाणाऱ्या संगीतावर आगोदरच नाचत असलेल्या मित्रांनी नवरदेवाला डान्स करण्याचा आग्रह केला. मित्रांचा आग्रह आणि डान्स करण्याची अंगभूत उर्मी यांमुळे नवरदेवही मग डान्स करण्यास प्रवृत्त झाला. त्याने आपल्या डान्सच्या खास स्टेप्सनी उपस्थितांना अचंबीत केले. घरी घटना तेव्हा घडली जेव्ह त्याने 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर डान्स सुरु केला.

नवरदेवाचा डान्स आणि मंडपात वाद

घटना तशी सादी पण मुलीच्या वडिलांना म्हणजे वरबापाला हा प्रकार मुळीच आवडला नाही. नवभारत टाईम्सच्या हवाल्याने इतर विविद प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या वडीलांनी तातडीने संगीत थांबविण्यास सांगितले आणि हा विवाह मोडला असे जाहीरही केले. ते येवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या कन्येला सोबत घेऊन वऱ्हाड्यांसोबत ते निघूनही गेले. प्राप्त माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबाने नवरदेवाच्या डान्समुळे संस्कार, प्रथा परंपरा आणि मुल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा, Virginity Test Case: हनीमुनपूर्वी वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, इंदूर न्यायालयाने केली कठोर कारवाई)

आगोदर ओरिजनल व्हिडिओ पाहा मग प्रकरण जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. घटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर लवकरच लोकप्रियता मिळवली, अनेकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्याने वृत्तपत्राचे कात्रन शेअर करत पोस्टील लिहीली. ज्याचा मथळा आहे: "पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी नवरदेव 'चोली के पीछे' वर नाचला पण, वधूच्या वडिलांनी लग्नच मोडले.

सर्वात मजेशी घटना

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विनोदी प्रतिक्रियाही दिल्या. एका व्यक्तीने लिहिले, सासऱ्यांनी योग्य निर्णय घेतला, अन्यथा त्यांना दररोज हा डान्स पाहावा लागला असता. दुसऱ्याने विनोद केला, हा अरेंज्ड मॅरेज नव्हता, तो एलिमिनेशन राउंड होता. दरम्यान, एका वापरकर्त्याने विनोद केला, 'जर तुम्ही 'चोली के पीछे' वाजवले तर मी माझ्या स्वतःच्या लग्नातही नाचेन.

लग्न रद्द झाले नसते तर?

काहींना कल्पना करुनच नाचण्याची इच्छा

या आधीही अशाच घटना अनेकदा घडल्या

दरम्यान, असामान्य कारणामुळे लग्न रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, उत्तर प्रदेशातील चंदौली येथील एका वराने जेवण देण्यास उशीर झाल्यामुळे त्याचे लग्न रद्द केले. एका आश्चर्यकारक वळणात, नंतर त्याच दिवशी त्याच्या मामेबहीणीशी लग्न केले. अचानक झालेल्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या वधूच्या कुटुंबाने लग्नाच्या व्यवस्थेवर खर्च झालेल्या 7 लाख रुपयांच्या नुकसानीचा उल्लेख करत पोलिस तक्रार दाखल केली.