मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात नोव्हेंबर 2023 मध्ये तिकीटविरहित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रोजची तपासणी सरासरी सुमारे 6,900 प्रकरणे आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 2.07 लाख विना तिकीट प्रवासी आढळून आले आहेत, जी संख्या मागील वर्षी याच महिन्यात, नोव्हेंबर 2022 दरम्यान 1.80 लाख होती. अशा प्रकारे यामध्ये 14.85 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई करत 13.70 कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 34.90 टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ही रक्कम 10.15 कोटी रुपये होती. प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी आणि तिकीटविरहित क्रियाकलापांना आळा घालण्याच्या प्रयत्नात मुंबई विभागाने उपनगरीय, मेल एक्सप्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी तीव्र केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंत, एकूण 14.19 लाख तिकीटविरहित प्रवास प्रकरणे आढळून आली.

(हेही वाचा: भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी केली शेअर; Maharashtra ATS कडून एका आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)