भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी केली शेअर; Maharashtra ATS कडून एका आरोपीला अटक

आरोपी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एजंटच्या संपर्कात होता.

भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी केली शेअर; Maharashtra ATS कडून एका आरोपीला अटक
Arrest (PC -Pixabay)

भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी शेअर केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने एका आरोपीला अटक केली आहे. नेव्हल डॉकमध्ये (सिव्हिल अप्रेंटिस) काम करणाऱ्या गौरव पाटील (23) या तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एजंटच्या संपर्कात होता. याप्रकरणी एटीएसने एकूण 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून, उर्वरित 3 संशयित गौरव पाटीलच्या संपर्कात होते. एटीएसने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: Action Against Eateries In Mumbai: मुंबईमधील 239 रेस्टॉरंट्सवर FDA ची कारवाई; आढळले गलिच्छ स्वयंपाकघर, शिळे अन्न, कालबाह्य गोष्टी, मुंग्या आणि झुरळे)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 13, 2023 07:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).