Man Attempts Suicide in Mantralaya: मुंबईतून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील मंत्रालय इमारतीत सोमवारी एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. इमारतीच्या आत लावलेल्या सुरक्षा जाळ्यांमुळे तो बचावला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरक्षा जाळीमध्ये तो माणूस 'भारत माता की जय' म्हणताना ऐकू येत आहे. 'सुरेश यादव'च्या गुंडगिरीला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा या व्हिडिओत तो करत आहे. अहवालानुसार, ही व्यक्ती वडापाव विक्रेता असून त्याच्या स्टॉलवर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचेही वृत्त आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. (हेही वाचा: Pune Crime: पुणे शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा, हल्ल्यात वृद्ध महिला ठार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)