मालेगाव मध्ये एका चिमुरड्याने लग्नाच्या हॉलच्या कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला शिताफीने जेरबंद केल्याचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. प्रसंगावधान राखत त्याने बिबट्याला जेरबंद केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या या घटनेत हा मुलगा मोबाईल पाहताना दिसत आहे. दरवाजा शेजारीच बसलेल्या या मुलाने बिबट्या आत शिरल्याचं पाहिलं. आरडाओरड न करता तो आधी बाहेर पडला आणि दरवाजा बंद करून घेत बिबट्याला जेरबंद केलं. मीडीया रिपोर्ट्सनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा शोध वनविभागाकडून सुरु होता.

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)