Maharashtra Exit Poll Results 2024: अखेर आज संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले. आता 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महायुतीची सत्ता आहे. मेगा एक्झिट-पोलनुसार, भाजप- 76, कॉंग्रेस- 60, शरद पवार गट- 46, उद्धव ठाकरे गट- 44, एकनाथ शिंदे गट 26, तर अजित पवार गटाला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती पुन्हा विजय संपादन करू शकते. यामध्ये महायुतीला 182 तर महाविकास आघाडीला 175-195 जागा मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Maharashtra Vidhansabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रात यावेळी कोणाची सत्ता? झी 24 तास वर पहा एक्झिट पोलचे निकाल)

Maharashtra Exit Poll Results 2024:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)