मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांसारख्या मित्रपक्षांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) विस्तार झाला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यामध्ये महायुतीच्या सत्तावाटपाच्या सूत्रानुसार 21-12-10 अनुक्रमे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपने काही जुन्या चेहऱ्यांना नव्याने संधी दिली. त्यामध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रविण दरेकर, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, यांसारक्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिपदाची शपथ घेताना
Maharashtra BJP chief Chandrashekhar Bawankule takes oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/FDva1TjdqO
— ANI (@ANI) December 15, 2024
गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेताना
BJP leaders Radhakrishna Vikhe Patil, Chandrakant Patil take oath as Cabinet Minister in the state government, at Raj Bhavan in Nagpur. pic.twitter.com/Rr2MWbRLmo
— ANI (@ANI) December 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)