उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दत्तामामा भरणे, यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. खरे तर मंत्र्यांना दिलेली पदे ही केवळ अडीच वर्षांसाठीच असती. अडीच वर्षांनी पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असे सुतोवाच अजित पवार यांनीच आगोदरच केले आहे. त्यामुळे या मंत्र्यांचा कारभार कसा राहतो आणि किती काळ राहतो याबाबत उत्सुकता आहे. जवळपास 33 वर्षांनी नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात या मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शपथ घेतलेले मंत्री खालील प्रमाणे:

हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)