औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये  निर्णय झाला आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव होणार आहे. याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून घेतला जाईल आणि नंतर केंद्र सरकार कडे तो पाठवला जाईल असे म्हणाले आहेत. यासोबतच नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. हे तिन्ही निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळात  झाले होते पण ती बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो अवैध असल्याचं सांगत आज पुन्हा नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)