वटपौर्णिमेला हिंदू महिला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. पण सध्या वास्तवात अनेक पुरूष पत्नी पीडीत आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. पिंपळाच्या झाडाला काही पुरूषांनी उलट्या दिशेने फिरून प्रदक्षिणा मारल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या या 'पिंपळपौर्णिमे'चा व्हिडिओ वायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पत्नीपीडित संघटना आहेया पत्नीपीडित संघटना दरवर्षी  वटपौर्णिमा च्या आधी पिंपळपौर्णिमा साजरी करतात.

पिंपळपौर्णिमा चा व्हिडीओ वायरल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)